![]()
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीताची सरस्वती’ या विशेष व्याख्यानासह तेलुगू सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीत वारशाचा जागर करण्यात आला. व्याख्यानातून त्यांच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलू उलगडले गेले तर विविध पारंपरिक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना भारतीय पारंपारिक शास्त्रीय संस्कृतीचे वैभव अनुभवण्याची संधी दिली. प्रारंभी तेलुगू साहित्य अकादमीचे समन्वयक अशोक कंटे, स्थानिक समन्वयिका सुरेखा कोडम व भिमराज कोडम, हरीश इरनक तसेच ‘भारतरत्न लता मंगेशकर – संगीताची सरस्वती’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रमुख व्याख्याते कस्तुरी मुरलीकृष्णा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुरलीकृष्णा म्हणाले, “लता मंगेशकर यांनी भारतातील जवळपास प्रत्येक राज्यातील भाषांमध्ये आपल्या सुमधुर आवाजातून गीते सादर करून भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या स्वरांनी लाखो-कोट्यावधी भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात तब्बल १०८ कलाकारांनी सहभाग नोंदविला. श्री गुरुदत्त महिला मंडळाने पारंपरिक मंगळागौर सादर करून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविले. एकदंत महिला मंडळाने तेलंगणातील प्रसिद्ध ‘बतकम्मा’ हा सांस्कृतिक सोहळा सादर केला. फुलांच्या सजावटीसह बतकम्मा तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच नित्य सेवा महिला मंडळ आणि मार्कंडेय ग्रुप यांनी संयुक्तपणे पारंपरिक कोलालु सादर करून तेलुगू संस्कृतीचे वैशिष्ट्य प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेखा कोडम, भीमराज कोडम, ज्ञानेश्वर मंगलारम, अजय म्याना, दीपक गुंडू, श्रीनिवास एल्लारम, संजय चिप्पा आदींनी परिश्रम घेतले.
Source link
अहिल्यानगर शहरामध्ये घुमला ‘लतादीदीं’च्या सुरावलींचा जागर:राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या उपक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद