![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात बारामतीच्या सहकार क्षेत्रातील पहिल्याच मोठ्या राजकीय लढतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून विरोधकांना खातेही उघडू दिले नाही. पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी मतदारांनी धुडकावून लावली. विरोधकांची मते विभागली, शिस्तबद्ध प्रचार निर्णायक सोमेश्वरची निवडणूक तिरंगी झाली असली, तरी खरी लढत अजित पवार यांच्या वारशाभोवतीच केंद्रित होती. गेली ३४ वर्षे संचालक व अध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर स्वतंत्र चूल मांडली. मात्र, जगताप यांच्यावर पक्षाने तातडीने केलेली हकालपट्टीची कारवाई सभासदांना “कडक शिस्तीचा संदेश’ देऊन गेली. वारशावर शिक्कामोर्तब अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील स्थानिक संस्थांवर कुणाचे नियंत्रण राहील, या शंकेला या निकालाने पूर्णविराम दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक थेट स्वतःच्या नेतृत्वाखाली जिंकून दाखवली. शरद पवार गटाला धक्का लोकसभेच्या निकालानंतर सहकार क्षेत्रात पकड निर्माण करण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न सोमेश्वरच्या निकालाने रोखला गेला आहे. युगेंद्र पवारांच्या पॅनलला एकही जागा न मिळणे हा त्यांच्या स्थानिक रणनीतीसाठी धक्का मानला जातो.
Source link
"सोमेश्वर’ मध्ये 21 जागा जिंकून सुनेत्रा पवारांचे वर्चस्व:युगेंद्रचे आव्हान फोल; जगतापांची बंडखोरीही नाकारली