![]()
छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घोडे मैदानाच्या खालील वळणावर सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. एकामागून एक तीन ट्रक धडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल चार त
.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या आयशर वाहनाची त्याला धडक बसली. त्यानंतर मागून येणाऱ्या तिसऱ्या ट्रकनेही धडक दिल्याने तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये एमएच ०४ ईवाय ४९८१ क्रमांकाच्या वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जीजे ३९ टीबी ९१७८ क्रमांकाचे वाहनही या अपघातात सहभागी होते.
अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सोयगाव मार्गे हळदा घाटाच्या दिशेनेही वाहनांची मोठी वर्दळ असल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ज्या चालकाने ब्रेक लावले, त्या वाहनाचे नुकसान कमी झाल्याने संबंधित चालक काही वेळाने वाहन घेऊन निघून गेल्याचे सांगण्यात आले. या अपघातप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते