![]()
आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात सोमवारी (दि. १२) दुसऱ्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसामान्
.
आमदार नितीन पवार यांनी यापूर्वी विश्वस्त संस्थेकडे सर्वसामान्य भाविकालाही महापूजेचे यजमानपद मिळावे, अशी विनंती केली होती. पंढरपूर येथे मुख्यमंत्री महोदयांसमवेत सर्वसामान्य भाविकाला श्री विठ्ठलाच्या महापूजेची संधी दिली जाते. त्याच धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर विजय पाटील यांना भगवतीच्या पंचामृत महापूजेत सहभागी होण्याचा मान देण्यात आला. भाविकांना प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी विश्वस्त संस्थेच्या धर्मार्थ रुग्णालयात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम कार्यरत आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी विश्वस्त संस्था, पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
भरजरी वस्त्रांसह सुवर्णालंकार दुसऱ्या माळेला भगवतीला पांढऱ्या रंगाचे भरजरी महावस्त्र नेसविण्यात आले होते. देवीला सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या पुतळ्यांचे गाठले, कोयरीहार, गुलाबहार, बोरमाळ, कर्णफुले आणि नथ, तसेच चांदीचे पाऊल, मुकुट आणि कमरपट्टा असे दागिने परिधान करण्यात आले होते. नित्य परंपरेनुसार सोमवारी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून देवीच्या दैनंदिन अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारुळे, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, शाम पवार आदी उपस्थित होते.
२४ तास मंदिर खुले पहिल्या माळेपासून सुरू झालेला भाविकांचा ओघ दुसऱ्या माळेलाही कायम होता.. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात आले आहे.