पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे तब्बल 12 दिवस चाललेले आंदोलन 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर पेपरफुटीच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थ
.
बदलीच्या चर्चांवर पूर्णविराम
एमपीएससी चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, तुकाराम मुंढे यांच्याकडील सध्याच्या ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) आयुक्तपदाचे काय होणार? त्यांची बदली झाली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. नेहमीच आपल्या धडक कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांच्या बदलीच्या अफवा वेगाने पसरत होत्या. या सर्व चर्चांना त्यांनी एका पोस्टद्वारे उत्तर दिले आहे.

तुकाराम मुंढे नेमके काय म्हणाले?
आपल्या पदाबाबतची स्थिती स्पष्ट करताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे की, “माझी एफडीएमधून (FDA) कोणतीही बदली झालेली नाही. मी अद्यापही महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरुद्धची आमची लढाई यापुढेही अशीच सुरू राहील.”

दरम्यान, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली आहे. आता तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कडक अधिकाऱ्याकडे या चौकशीची सूत्रे आल्याने एमपीएससी प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटत आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत MPSC चे अध्यक्ष रजेवर
दरम्यान, मंत्र्यांनी आंदोलकांच्या इतर मागण्याही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये आंदोलनाशी संबंधित काही लोकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, तीन वर्षांत ७० हजार पदांवर भरती करणे, जानेवारीत होणाऱ्या गट-क परीक्षेतील जागा वाढवणे आणि MPSC चे अध्यक्ष व सचिव यांच्या नियुक्तीपूर्वी त्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी करणे यांचा समावेश आहे.
यानंतर MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली. त्यांनी X वर पोस्ट करून सांगितले की, त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कायम राहण्याऐवजी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

————
हेही वाचा..
राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या: मंजिरी मणोलकर यांच्यासह शुभम गुप्ता, भालचंद्र चव्हाण यांची नवीन नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने सोमवारी (12 ऑक्टोबर 2026) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 3 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार डॉ. मंजिरी मधुसूदन मणोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ आणि बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत. सविस्तर वाचा