पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आपल्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक लढ्याची दिशा स्पष्ट केली आहे. “विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे तूर्तास MPSC चा लढा मार्गी लागला आहे, मात्र आता थांबायचे नाही, तर नवा लढा
.
MPSC चे यश ही केवळ सुरुवात
रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या भक्कम एकजुटीला दिले आहे. सलग ११ दिवस चाललेल्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांची ताकद सरकारला दिसली असून हा लढा तूर्तास मार्गी लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यापुढील इतर प्रश्नही तितकेच गंभीर असल्याने आता आपला मोर्चा त्या प्रश्नांकडे वळवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शेतकरी आणि CET च्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरणार
आपल्या नव्या लढ्याची रूपरेषा मांडताना रोहित पवारांनी राज्यातील दोन प्रमुख घटकांकडे लक्ष वेधले आहे.
- दुष्काळग्रस्त शेतकरी: राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून, होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी आता आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- CET परीक्षेतील गोंधळ: सीईटी (CET) परीक्षांच्या आयोजनातील गैरकारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या त्रस्त विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी नवा लढा उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
‘अजितदादांवरील अन्याय…’
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर झालेल्या अन्यायासाठीही लढा देणार असल्याचे म्हटले आहे. या विधानातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच राजकीय मुद्दाही पुढे आणला आहे.
“लडेंगे..! जितेंगे..!” चा नारा
आपल्या पोस्टच्या शेवटी रोहित पवार यांनी “लडेंगे..! जितेंगे..!” हा आक्रमक नारा दिला आहे. MPSC च्या यशानंतर आता शेतकरी, विद्यार्थी आणि थेट अजितदादांच्या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक झाल्याने आगामी काळात राज्य सरकारला आणखी एका मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
————
हेही वाचा..
माझी FDA मधून बदली झालेली नाही:निकृष्ट औषधं अन् भेसळीविरुद्धचा लढा सुरूच राहील, MPSC समितीच्या नियुक्तीनंतर तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे तब्बल 12 दिवस चाललेले आंदोलन 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर पेपरफुटीच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या सचिवपदी डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीनंतर मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र खुद्द तुकाराम मुंढे यांनीच यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा