![]()
फुलंब्री-राजूर रस्त्यावर वसलेल्या रिधोरा येथील प्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उत्सवासाठी रेणुकामाता संस्थान कमिटी, रिधोरा यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन क
.
रिधोरा येथील श्री रेणुकामाता मंदिर हे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची सकाळ-संध्याकाळ महाआरती, धार्मिक विधी, भजन तसेच विविध धार्मिक कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अष्टमी व नवमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाविकांसाठी सोयी-सुविधांचे नियोजन
नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांग तसेच भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन रेणुकामाता संस्थान कमिटी, रिधोरा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी रेणुकामाता संस्थान कमिटी, रिधोरा, शिवछत्रपती राजे नवतरुण मंडळ यांच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात येत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री रेणुकामातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन केले आहे.