Headlines

लाडसावंगी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन:तिकांडे यांच्या कीर्तनाने गावकऱ्यांची मने जिंकली‎




शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सावळेश्वर मंडळाच्या वतीने लाडसावंगी येथील गांधी चौकात पहिल्या माळेनिमित्त भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सायंकाळी अशोक ढोके यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संगमनेर येथील प्रसिद्ध जयश्रीताई तिकांडे यांच्या सुमधुर आवाजात कीर्तन सोहळ्याची सुरुवात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या “आवडे देवासी तो ऐका प्रकार । नामाचा उच्चार रात्रंदिन ॥’ या प्रसिद्ध अभंगाने झाली. या अभंगावर निरूपण करताना त्यांनी नामाचे महत्त्व, तुळशीमाळ, गोपीचंदन टिळा आणि वैष्णवांचा हृदयात असणारा कळवळा यावर प्रकाश टाकला. तसेच “आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हेच खरे साधन आहे,’ असे प्रतिपादन केले. ​महिला सुरक्षेचा संदेश आणि भक्तीचा महिमा आजच्या काळात माणसाने माणसातला माणूस राखून ठेवला पाहिजे. आपल्या बाजूला किंवा समोर येणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले तरच आपली नवरात्री साजरी झाली असे म्हणता येईल, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तसेच भक्ताच्या हाकेला धावून जाणाऱ्या भगवंताच्या नामामध्ये प्रचंड ताकद असल्याचे सांगत प्रल्हादाला उकळलेल्या तेलात टाकले किंवा पर्वतावरून ढकलून दिले तरी केवळ भगवान श्रीविष्णूंच्या नामस्मरणामुळेच खांबातून नरसिंह अवतार प्रगट झाला व हिरण्यकशिपूचा वध झाला या कथेचा सुंदर दाखला त्यांनी दिला. कीर्तनात यांची उत्कृष्ट संगीत साथ लाभली या धार्मिक सोहळ्यात उत्कृष्ट संगीत साथ लाभली. यामध्ये मृदंगसम्राट ऋषिकेश महाराज तरासे, ​गायनचार्य दीपक साळुंके, गणेश महाराज जाधव, सदानंद महाराज क्षीरसागर आणि दत्ता महाराज शेळके, गावातील समस्त भजनी मंडळ तसेच महिला मंडळाच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा हरिकीर्तन सोहळा पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *