Headlines

बिलोणी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात पारायण, कीर्तन, हरिपाठ:मराठवाड्यातून हजारो भाविक होतात दाखल; सकाळपासून भाविकांच्या रांगा‎




बिलोणी येथील जागृत ग्रामदैवत मानले जाणारे तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या वतीने घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून भाविकांची दर्शनासाठी घटस्थापनेच्या पहिल्या माळेपासून रांगा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथे श्री तुळजाभवानी मातेचे प्राचीन जागृत भव्य प्रसिध्द मंदिर असुन दर वर्षी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. या मंदिरातील दिपमाळेवर एका शिलालेखात तुळजाभवानी मातेच्या क्षेत्राचा विस्तार दाखविणारी ओवी रेखाटल्या आहेत. येथील जाणकारांकडून असे बोलले जाते की तुळजापुरहुन तुकाई तुळजाभवानी माता भ्रमण करत असताना बिलोणी या गावाच्या डोंगराच्या टेकडी वरील रम्य स्थळं पाहुन या ठिकाणी थांबली होती येथील देवीची पुजा करणारा भक्त जीवनराव कुलकर्णी हे देवीची मनोभावे पुजा करत असत. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा खंडोजी सुत याला देवी प्रसन्न झाली होती, असे सांगण्यात येते. मग त्याने तुळजाभवानी मंदिरासमोर १७६५ मध्ये दीपमाळ बांधली असा तुळजापूर ग्रंथामध्ये पान नं ३७ हा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तुळजाभवानी मातेला पहिले तुकाई या नावाने संबोधले जायचे. देवीच्या मंदिराची दक्षिण दिशेला रामेश्वराचे शंकराचे जुने मंदिर आहे. पुर्वी तुळजाभवानी माता मंदिराचे व रामेश्वर मंदिराचे जिर्णोधाराचे काम अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाला होता. येथील दीपमाळ आहे. या दिपमाळेवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या दिपमाळेवर गेल्यावर परिसरातील निसर्गरम्य वातावरण बघावयास मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मंदिरातील आतील भागात देवीची मुर्ती विराजमान असुन नवरात्रामध्ये नऊ दिवस इथे मोठी भव्य यात्रा भरते परिसरासह मराठवाड्यातून येथे भाविक येतात ही देवी गावाचे कुल दैवत मानले जाते या मंदिरातील देवीची पुजाअर्चा, देवीची आरती व साफसफाई पूर्वीपासून गुरव समाजातील घराण्यांकडे असुन ते भक्ती भावाने पार पाडतात. महाराष्ट्रात तुळजापुरनंतर बिलोणी हे तुळजाभवानी मातेचे उपपीठ मानले जाते. ज्या भक्तांना तुळजापूरला जाणे शक्य होत नाही ते भक्त येथे आवर्जुन दर्शनाला येत असतात. अनेक भाविकांच्या घरामध्ये शुभ कार्याकरण्या पुर्वी देवी मंदिरात येऊन देवीची भक्तिभावाने पूजाअर्चा करून कार्यक्रमाला आमंत्रित केले जाते. तसेच इच्छापूर्ती साठी देवीला नवस करतात नवरात्रात या ठिकाणी घट स्थापनाही करण्यात येते. सध्या भाविक दर्शनासाठी येत आहेत. बिलोणी गावात ९०० कुटुंब असून ९०० घटांची स्थापना वैजापूर तालुक्यातील साडेतीन हजार ते चार हजार च्या आसपास लोकसंख्या असलेले बिलोणी हे गाव डोंगर भागात वसलेले असून येथे प्राचीन काळातील तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवामध्ये येथे मोठी यात्रा भरते विशेष म्हणजे यातील ९०० कुटुंब असुन ९०० घटांची स्थापना या मंदिर परिसरात केली जाते. गावाच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप तुळजाभवानी माता आमचे कुलदैवत असुन दर वर्षी नवरात्र महोत्सवात भक्ती भावाने साजरा केला जातो. वारकरी संप्रदायाची जोपासना करत देवीची आराधना करण्यात येत आहे. पहाटे काकड आरती, मातेचे पुजन, पारायण, हरीपाठ, किर्तन, गोंधळ असे दैनंदिन कार्यक्रम घेतले जात असुन आज पर्यंत पंधरा हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असुन गावाच्या वतीने महाप्रसाद देण्यात येतो. -अशोक हाडोळे, ग्रामस्थ बिलोणी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *