Headlines

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या:फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथील घटना, पोलिसांत नोंद‎




कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील धानोरा येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तुळशीराम पुंडलिक साळुंके (रा. धानोरा, ता. फुलंब्री) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तुळशीराम साळुंके यांच्यावर बँक पीक कर्जासह महिला बचत गट आणि खासगी सावकारांचे कर्ज होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच वडोदबाजार पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून पुढील उपचारासाठी व शवविच्छेदनासाठी फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सोमवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *