![]()
येथील प्रसिद्ध कलाकार किरण केदारे यांनी एका नारळावर रेणुका मातेची सुंदर व मनमोहक प्रतिकृती साकारली आहे. ॲक्रेलिक रंगांच्या साहाय्याने नारळाच्या छोट्याशा पृष्ठभागावर रेणुका देवीचे हुबेहूब रूप रेखाटण्यासाठी त्यांनी चार ते पाच तास अखंड मेहनत घेतली. या प्रतिकृतीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. नारळाच्या मर्यादित आकारावर देवीचे रूप साकारताना अचूकता, रंगांचा योग्य वापर आणि सूक्ष्म निरीक्षण यांची मोठी कसोटी लागते. किरण केदारे यांनी अत्यंत संयमाने आणि एकाग्रतेने हे आव्हान पेलले. त्यांनी या कलाकृतीमध्ये वापरलेली रंगसंगती, सूक्ष्म रेखाटन आणि देवीच्या रूपातील बारकावे इतके अप्रतिम आहेत की, पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले जाते. या उपक्रमासाठी रेणुका माता मंदिर संस्थानाचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांचे सहकार्य लाभले. यासाठी विजय जोशी, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, राहुल पगारे, कृष्णा केदारे आणि सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. रेणुका देवी मंदिरात सामुदायिक आरती चांदवड येथील रेणुका देवी मंदिरात किरण केदारे यांनी ही श्रीफळावरील प्रतिकृती आणली. देवीच्या मूळ मूर्तीसमोर हे श्रीफळ ठेवून उपस्थित भाविकांनी सामुदायिकरीत्या आरती केली.
Source link
नारळावर साकारले रेणुका मातेचे सुंदर, मनमोहक रूप:चांदवडचे कलाकार केदारे यांचा कलाविष्कार