Headlines

लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी साकारला तीन किमी रस्ता:शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांचा पुढाकार; नळवाडी परिसरात एकजुटीतून रस्ताकाम‎



सिन्नर, अकोले आणि संगमनेर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन दळणवळण आणि शेतात ये-जा क

.

गत आठवड्यात तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यावर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मठाधिपती विलास महाराज भोसले यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सहाणे, लोकशिक्षण मंडळाचे विश्वस्त सुदाम दराडे, मारुतीराव दराडे, शिवाजी दराडे, एक, प्रकाश दराडे, मारुती दराडे, शिवनाथ दराडे,जनार्दन दराडे, शिवाजी घुले, वसंत सहाणे, मनोहर घुले, गणपत दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रायदुर्ग येथील नळराज ऋषी गडाच्या पायथ्यापासून चिकणी शिव रस्त्यापर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना अडचणी येत होत्या. पावसाळ्यात तसेच इतर दिवसांतही रस्त्यावरून ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेत आपापल्या परीने लोकवर्गणी जमा केली आणि स्वखर्चातून रस्त्याचे काम हाती घेतले.

या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी ८७ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा केली. तसेच जनसेवक राजेंद्र चिमणराव सहाणे यांनी ७५ हजार रुपयांचे विशेष आर्थिक सहकार्य केले. या योगदानासह सुमारे एक लाख ६० हजार रुपये खर्च करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *