Headlines

कोल्हापुरातील प्रेयसीचे लग्न ठरल्यानेतिची 250 फूट खोल दरीत ढकलून हत्या:पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाची भुदरगड तालुक्यात पुनरावृत्ती



लग्न दुसरीकडे ठरल्याने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला २५० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील नाईकवाडीजवळ घडली. हत्येनंतर आरोपीने प्रेयसी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दि

.

आरोपी श्रीपाद दिनकर वडार (२५) आणि मृत तरन्नुम बशीर नाईक हे दोघे गारगोटी येथील अवधूत कॉलनीत राहत होते. तेव्हा त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

तरन्नुम महागावमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. तिचे लग्न ठरले होते त्यामुळे तिने श्रीपादसोबतचे प्रेमसंबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. याचा राग आल्याने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता श्रीपादने तिला भेटायला बोलावले आणि नाईकवाडीजवळील दरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर बनाव करत तो स्वतःच भुदरगड पोलिस ठाण्यात जाऊन तरन्नुम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांना तपासात श्रीपादवरच संशय बळावला. सखोल तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

लोहगडावरही घडली होती अशीच घटना

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर १८ जून २०२६ रोजी अशीच घटना घडली होती. सिया गोयल या तरुणीने तिचा भावी पती केतन अग्रवाल याला तब्बल ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले होते. दरीत ढकलून देण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे.

१२ ऑक्टोबरला लग्न होते

तरन्नुमचे १२ ऑक्टोबरला लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या तीन दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. तरन्नुमला श्रीपादने फिरायला नेले, अशी माहिती तिच्या आईने दिली. तर आरोपीने तिची हत्या करून आपण पाणी आणण्यासाठी गेलो असताना ती दिसेनाशी झाली, असा बनाव केला, असे तरुणीचे नातेवाइक साजिद गडकरी यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *