महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या स्ट्राँगरूममधील खजिन्यात राजे-महाराजे, विविध संस्थाने आणि लाखो भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांचा अनमोल ठेवा आहे. देवीच्या खजिन्यात सुमारे २५३ किलो सोने व ४,५२३ किलो चांदीचे दागिने असल्याच
.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठशांचा उल्लेख असलेली सोन्याच्या मोहरेची माळ आहे. शारदीय नवरात्रोत्सवासह वर्षभरातील सण, उत्सवात हे दागिने देवीला परिधान केले जातात. त्या वेळी सर्वसामान्य भाविकांना हे अलंकार पाहता येतात. दागिन्यांची देखभाल मंदिर संस्थानच्या वतीने पंचांसमक्ष केली जाते. एखाद्या दागिन्याचा धागा निघाला असेल किंवा दागिना काळवंडला असेल, तर त्याची डागडुजी स्थानिक सराफाला बोलावून करण्यात येते. तसेच वेळोवेळी स्ट्राँगरूममधील दागिन्यांची स्वच्छता केली जात असल्याचे देवस्थानच्या व्यवस्थापक माया माने यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.

एकूण ७१ ऐतिहासिक नाणी देवीला अर्पण केली आहेत. बिकानेर संस्थानची ४ नाणी डॉलर ६ चित्रकूट उदयपूर संस्थान : ३ नाणी ज्युल्स १ शाहआलम इझरा ४ बिबा शूरुक १ फुलदार १ दारुल खलिफा १ दोन आणे २ इंदूर स्टेट : सूर्यछाप १ फरोकाबाद १ लखनऊ १ पोर्तुगीज ९ इस्माईल शाह १ बडोदा २ रसल इल्ला अकबर व शाहजहान ४ ज्युल्स हैदराबाद ५, अनद नाणी २० आहेत.
१९६३, २०११, २०१८ व २०२३ मध्ये दागिन्यांची मोजदाद झाली आहे, असे माहिती अधिकार अर्जातून समोर आले असल्याचे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी ‘दिव्य मराठी सांगितले.
मुकुटाला कळस, त्यावर सोने, मोती, पाचू, माणिक, जडावकाम. शिरपेच आणि कलगीतही मौल्यवान खडे नथीमध्ये मोठा मोती, एक लाल खडा, दोन मोठे आणि ९ लहान मोती नेत्रजोडामध्ये २ मोठे, ४१ लहान माणिक मोत्याचा तुरा जडावी पट्टी पदके चंपाकळीची माळ
देवीच्या नेत्रजोडात ४३ माणिक अन् खजिन्यात पाचू, मोती, हिरे, ५ पदरी कंठा, ७ पदरी सतलडा
५ पदरी कंठा ७ पदरी सतलडा सोन्याच्या पादुका सोन्याचा मुकुट पाचू-माणिक जडवलेली पदके हिरकणीचे पदक छत्र चिंताक शिरपेच कलगी कानजोड नथ मंगळसूत्र तन्मणी सूर्यहार जडावी खडावा हिऱ्याचा हार पांढऱ्या खड्यांचा सोन्याचा हार दशावतार वेणी