![]()
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या हुकूमशाहीचा अंत होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,’ असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) सांगितले. दिल्ली पोलिसांनी दबाव आणून सुटकेच्या कागदावर आपली सही घेतली, असा दावाही त्यांनी केला. हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी येथे त्यांची आजी सावित्राबाई दिपके यांच्या रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमात ते आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना दिपके म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी मानसिक छळ केला आहे. मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर कुठे नेले, याची माहिती दिली नाही. पहाटे साडेतीन वाजता कुटुंबाला फोन करून माहिती द्यावी, असे सांगितले. त्यातून माझ्या कुटुंबाला मानसिक धक्का देण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला. दिल्ली पोलिसांनी आजीच्या मृत्यूची बातमी सांगतानाचा काढलेला व्हिडिओ व्हायरल केला. मात्र पूर्ण व्हिडिओ व्हायरल केला नाही. अनेक ठिकाणी व्हिडिओतील भाग काढला. व्हिडिओ व्हायरल करून संवेदनशीलता दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मी चुलत भावाला बोलू द्या. वकिलांना बोलू द्या, अशी विनंती केली. त्यांनी ऐकले नाही. त्या वेळी संवेदनशीलता कुठे गेली होती, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांकडून माझ्या कुटुंबाच्या मानसिक छळाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन केले दिपके म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता माझ्याकडे अटकेचे पेपर आणले. ‘तू आता दीर्घकाळ जेलमध्ये जाणार आहेस. लवकर यावर सही कर. तुझ्या आई-वडिलांना फोन करून सांग,’ असा दबाव टाकला. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मानसिक छळाचाच प्रकार होता, असेही दिपके यांनी सांगितले.
Source link
मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा अंत होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही- दिपके:आजीच्या रक्षा सावडण्यासाठी आल्यानंतर हिंगोली येथे केला दावा