![]()
तुम्ही घरात किंवा उद्योगात किती वीज वापरली, यापेक्षा त्या विजेवर लादले जाणारे विविध छुपे कर आणि अधिभार सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चटका देत आहेत. महावितरणच्या बिलात ऊर्जा आकारासोबत स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार आणि राज्य सरकारचे भरमसाट १६ टक्के वीज शुल्क जोडले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या विजेच्या किमतीपेक्षा अधिभाराचा बोजा दीड ते दुप्पट होत असल्याचे “दिव्य मराठी’च्या तपासात उघड झाले आहे. राज्यातील ३ कोटी १२ लाख ग्राहकांपैकी सुमारे ७० टक्के (२.१८ कोटी) ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे आहेत. याच अल्प वापरकर्त्यांना अधिभाराचा सर्वाधिक फटका बसत आहे. दरम्यान, गेल्या वर्षांत ४ वर्षांत सरकारच्या तिजोरीत ३,५०० कोटींची भर पडली आहे. वीज शुल्क रद्द करावे, समप्रमाणात अधिभार आकारणी व्हावी देशात महाराष्ट्रात विजेचे दर सर्वात जास्त आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना सरासरी १० रुपये प्रतियुनिट वीज दर पडतो. याकडे वीज नियामक आयोग, सरकार व महावितरण प्रशासनाने अतिशय गांभीर्याने बघून सरकार प्रत्येक ग्राहकांकडून जे वीज शुल्क वसूल करत आहे ते रद्द करायला हवे. तसेच समप्रमाणात व कमीत कमी विविध अधिभार आकारणीचे दर निश्चित केले पाहिजे. -हेमंत कापडिया, माजी ग्राहक प्रतिनिधी अधिभार कमी केले तर इतर राज्यांच्या तुलनेत वीज स्वस्त सरकारने वीज शुल्क १६ टक्के, स्थिर आकार १४० रुपये, वहन आकार आदी अधिभार कमी केले तर इतर राज्याच्या तुलनेत वीज स्वस्त होईल. सध्या वीज वापरापेक्षा अधिभाराचा भुर्दंड दुप्पट भरावा लागतोय. -संदीप रामराव दंदाले, वीज ग्राहक ग्राहकांच्या हिताचा शासन सर्वतोपरी विचार करेल वीज दर व अधिभारातील वीज शुल्कासाठी वीज नियामक आयोगाकडून मान्यता घेऊन ते ग्राहकांना आकारले जात आहे. ग्राहकांच्या हिताचा शासन सर्वतोपरी विचार करेल. -नारायण कराड, सहसचिव, ऊर्जा विभाग, राज्य शासन वीज बिलातून समजून घ्या अधिभाराचा हिशेब ग्राहकाचे नाव : जालिंदर वाघमोडे आणि लक्ष्मी वाघमोडे, सप्टेंबर महिन्यातील वापर ४० युनिट वीज शुल्क १६ टक्क्यांप्रमाणे ५८.९४ रुपये सरकारची वसुली
Source link
आकारांचा बोजा:वापर 158 रु., भुर्दंड 268 रुपयांचा; वीज वापरापेक्षा अधिभारच दुप्पट, राज्यातील 3.12 कोटींवर वीज ग्राहक झाले हैराण