Headlines

आमचे शहर म्हणजे ‘जैनांची नगरी’ अन् ‘मिनी राजस्थान- नरेंद्र मेहता:मिरा भाईंदर कोळी, आगरी अन् मराठी माणसांचं- मनसे




मिरा भाईंदर शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीवरून सुरू असलेला राजकीय वाद आता तापला आहे. ठाण्यात झालेल्या एका जैन समुदायाच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ आणि ‘मिनी राजस्थान’ असा केला होता. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेत मेहतांवर कडाडून टीका केली आहे. मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मेहता यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. नरेंद्र मेहता यांनी ठाण्यात जाऊन मिरा-भाईंदर हे जैकांची नगरी असल्याचे विधान केले आहे. मिरा-भाईंदर हे केवळ एका समाजाचे नसून ते कोळी, आगरी आणि सर्वसामान्य मराठी माणसांचे आहे, असे सांगत पोपळे यांनी मेहतांना जोरदार प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मेहतांचे वक्तव्य काय? नरेंद्र मेहता म्हणाले की, आपली जबाबदारी आणि कर्तव्ये आणखी वाढली आहेत, कारण सन्मानाचे ओझे हे सर्वात मोठे असते; त्याचे ऋण कोणत्याही जन्मात फेडता येत नाहीत. मिळालेला सन्मान चांगल्या कामांच्या व सत्कृत्यांच्या माध्यमातून समाजाला परत करण्याचा प्रयत्न करा. हा सन्मान आपल्याला आयुष्यभर चांगली कामे करत राहण्याची प्रेरणा देतो. ज्या शहरातून मी येतो, त्याला ‘मिनी राजस्थान’ आणि ‘जैनांची नगरी’ म्हटले जाते. आमच्या शहरात 33 पेक्षा जास्त जिनालये असून, मोठ्या संख्येने साधू-महात्म्यांचे आगमन होत असते. चला, या सर्वांकडून प्रेरणा घेऊया. मेहतांच्या हॉटेलमध्ये दारू अन् कंदमुळे मिळतात मनसेचे सचिन पोपळे म्हणाले की, मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाण्यामध्ये जात मीरा-भाईंदर हे जैनाची नगरी आहे अशी गरळ ओकली आहे. त्यांनी हे धंदे बंद करावे, मीरा-भाईंदर हे कोळी, आगरी आणि मराठी माणसाचे आहे. लहान मुलांच्या डब्ब्यात कंदमुळे बंद केली. याला मनसेने विरोध केला यावेळी अविनाश जाधव यांनी शाळेला भेट दिल्यावर तुम्ही घाबरत निर्णय मागे घेतला, त्याच वेळी मनसे जिकंली. मेहता यांना लहान मुलांच्या डब्ब्यात कंदमुळे नको सांगितले. पण त्यांच्या हॉटेलमध्ये दारु आणि त्यासह सर्व कंदमुळे विकली जातात. ..तर मनसे पाठीशी उभी राहणार सचिन पोपळे म्हणाले की, मेहतांना शाळेत धर्म लगतो तर पैसै कमावताना धर्म लागत नाही. मेहतांनी डबल ढोलकी वाजपणे बंद करावे. मीरा-भाईंदरमधील जनतेमध्ये वाद वाढवण्याचे काम करू नका. तुम्हाला कुठली मस्ती आली आहे. महपौर, आमदार, आणि काही नगरसेवक जैन समाजाचे असल्याने तुम्हाला मस्ती आली आहे का? 35 नगरसेवक मराठी असताना ते आवाज उचलत नाही. मनसे हा पक्ष मराठी माणसांसाठी कायम आवाज उचलणार आहे. आमच्या मराठी माणसांवर अन्याय झाला तर आम्ही कालपेक्षा मोठा मोर्चा काढू. हे ही वृत्त वाचा इंडिया आघाडी म्हणजे कुटुंब वाचवण्यासाठीचा प्रयत्न: उबाठा-मनसेचा मोर्चा ‘गर्जना’ नाही तर ‘गजकर्ण’ मोर्चा- नवनाथ बन राहुल गांधी यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत हे अशा पद्धतीचा मोर्चा काढत आहेत. इंडिया आघाडी ही कोणत्याही वैचारिक मुद्द्यावर बनलेली नाही, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी आणि कुटुंब वाचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. दिल्लीत गांधी कुटुंब, युपीत यादव तर मुंबईत ठाकरे कुटुंब, पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी कुटुंब वाचवण्याचे काम करण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *