Headlines

आमदाराने 40 लाख कमिशन मागितल्याचा आराेप:ठाकरे सेनेच्या इंगवलेंकडून व्हिडिओ व्हायरल, क्षीरसागर आज देणार स्पष्टीकरण




कोल्हापूर उत्तरचे शिंदे गटाचे आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामातील टक्केवारीचे ४० लाख रुपये कमिशन मागितल्याचा एक व्हिडिओ ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जारी केला आहे. तो व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट भाष्य टाळले असून, रविवार, २८ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन सत्य परिस्थिती मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा प्रकार खंडणी आणि दमदाटीचा असल्याचा घणाघात रविकिरण इंगवले यांनी केला असून, या प्रकरणी आपण रीतसर पोलिस तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या व्हिडिओची दखल घेत क्षीरसागरांनी जनतेसमोर जाहीर खुलासा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ या व्हिडिओची पुष्टी करत नाही. काय आहे, कोल्हापूरचे आमदार क्षीरसागरांचा व्हिडिओ इंगवलेंनी व्हायरल केलेला हा व्हिडिओ २५ ऑक्टोबर २०२५ रोजीचा आहे. तो जिल्ह्याबाहेरील एका ठिकाणचा असल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणात शासकीय कामाच्या टेंडरसाठी ७ टक्के कमिशन देण्याच्या वाटाघाटी सुरू असल्याचे समोर आले. ५ टक्क्यांच्या हिशेबाने कंत्राटदाराकडून क्षीरसागरांना ४० लाख रुपये पोहोचवले गेले, तर “राहुल’ आणि “प्रशांत’ यांना प्रत्येकी १ टक्का देण्याचे नियोजन यात ऐकू येते. मात्र, हा व्यवहार फिस्कटल्याचेही स्पष्ट होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *