![]()
मोर्शीपासून १० कि.मी.वरील हिवरखेड येथील बसथांब्यासमोर सोमवारी २१ जुलैला रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास आयशर ट्रकने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोमधील ३५ वर्षीय प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरूड ते हिवरखेड मार्गे मोर्शीकडे येणाऱ्या आयशर ट्रकने विरुद्ध दिशेने बेलोराकडे जाणाऱ्या ऑटोला समोरासमोर धडक दिली. त्यात ऑटोमधील शीतल रवींद्र ताथोडे (३५, रा. बेलोरा, ता. वरूड) यांचा मृत्यू झाला. याचवेळी या अपघातात आबाराव पुंडलिकराव ताथोडे (६९), श्लोक रवींद्र ताथोडे (१३, दोघेही रा. बेलोरा), प्रज्वल मदन तिडके (२६, तळणी), आकाश शेषराव भलावी (३२) आणि इरफान पठाण (३०, तळणी) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी गेले . ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, जखमींना रुग्णवाहिका व खासगी वाहनांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पाचही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले. ऑटोला चिरडून आयशर ट्रकने हिवरखेड बसथांब्यासमोर चार ते पाच उभ्या दुचाकींनाही धडक दिली. त्यामुळे त्या दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसथांब्यासमोरील स्पीड ब्रेकरवरून जातानाही ट्रक चालकाने वेग कमी केला नव्हता. त्या कारणाने ट्रक नियंत्रणात आला नाही व अपघात घडला आहे.
Source link
आयशर ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू,:अपघातात ऑटाेमधील पाच जण जखमी, हिवरखेड येथील बसथांब्यासमोर घडली घटना