Headlines

सोनम वांगचूक यांचे समर्थन; खामगावात विद्यार्थ्यांचे आंदोलन:विद्यार्थी कृती समितीने एसडीओंना दिले निवेदन‎




देशात आणि राज्यात होणाऱ्या शिक्षण घोटाळ्या विरोधात व सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर २१ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज २१ जुलै सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद केले आहे की, सोनम वांगचूक यांची तत्काळ सुटका करावी, पेपरफुटीच्या सूत्रधारांना कडक शिक्षा करण्यात यावी, नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या सर्व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात यावे, नीट पेपर फुटी मुळे मानसिक दृष्ट्या खचून आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना एक करोड पर्यंत मोबदला देण्यात यावा यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देता वेळी विद्यार्थी कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *