![]()
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले भास्करराव यादवराव कुळकर्णी यांचे सोमवारी उशिरा रात्री निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. मंगळवारी, १६ नोव्हेंबर रोजी बडनेरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुळकर्णी हे सामाजिक समरसता मंचाचे माजी प्रांत उपाध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी विभाग संयोजक होते. ते पत्रकारही होते. बडनेरा येथील गांधी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी मिसाबंदी म्हणून १८ महिने तुरुंगवास भोगला होता. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी हे त्यांचे पुत्र आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भास्करराव कुळकर्णी अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या पश्चात मुलगा शिवराय, कन्या डॉक्टर अश्विनी अशोक थोडगे, सून, नातवंडे आणि आप्तेष्ट आहेत. बडनेरा येथील शिक्षक कॉलनीतील ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. बडनेरा नवी वस्तीतील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी आरएसएसचे विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला. सभेचे संचालन भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी जयंत डेहनकर यांनी केले.
Source link
आरएसएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव कुळकर्णी यांचे निधन:96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी व्यक्त केला शोक