Headlines

आर्थिक फसवणुकीतून उद्योजकाची आत्महत्या:चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल




आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून एका उद्योजकाने आत्महत्या केली आहे. ही घटना पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मीनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नथुसिंह राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित आणि प्रल्हाद चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अशोक जैन हे उद्योजक होते. त्यांनी १० मे रोजी आपटे रस्ता परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. घटनास्थळी पोलिसांना जैन यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, जी जप्त करण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. आरोपी नथुसिंह राजपुरोहित आणि इतरांनी कोंढवा येथील एका प्लॉटच्या विकसनासाठी मृत अशोक जैन यांना दिला होता. आरोपी आणि जैन यांच्यात ५० वर्षांपासून संबंध असल्याने, सुरुवातीला कोणताही लेखी करारनामा न करता तोंडी व्यवहार झाला होता. मात्र, कामाला सुरुवात झाल्यानंतर आरोपींनी अशोक जैन यांना नुकसान होईल असा करारनामा करण्यास भाग पाडले. करारनाम्यानुसार, प्रकल्पाच्या कायदेशीर प्रक्रियेचा खर्च आरोपींनी करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी पैसे दिले नाहीत. तसेच, आरोपींनी प्रकल्पात अनेक बदल करण्यास सांगितले, ज्यामुळे जैन यांना आर्थिक नुकसान झाले. आरोपींनी केलेल्या आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याचे मोहित जैन यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *