![]()
गरिबांच्या ताटात जाणाऱ्या रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सात्रळ येथील सात्रळ ग्रुप विकास कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात ऑगस्ट महिन्यात आलेल्या गव्हाच्या एका गोणीत चक्क १२००
.
ऑगस्ट महिन्यासाठी दुकानात एकूण ३९२ गोण्या धान्य आले आहेत. त्यामध्ये १५२ गोण्या तांदूळ, तर २४० गोण्या गव्हाच्या आहेत. गव्हाची गोणी उघडून धान्य काढताना दगड आढळल्याने दुकानदारही चक्रावून गेला. विशेष म्हणजे, रेशनच्या धान्यात यापूर्वीही घाण, बारीक खडे, प्लास्टिक व कागदाचे तुकडे आढळत असल्याच्या तक्रारी आहेत.
इतकेच नव्हे तर गोण्यांमध्ये धान्याचे वजनही कमी येत असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. याबाबत तालुका वितरण अधिकाऱ्यांकडे यापूर्वी लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वजनात तूट असल्याने लाभार्थ्यांना प्रत्येकी सुमारे ३०० ते ५०० ग्रॅम धान्य कमी द्यावे लागत असून, त्याचा रोष दुकानदाराला सहन करावा लागत आहे.
रेशनच्या धान्यात थेट दगड आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, संबंधित धान्याचा पुरवठा कुठून झाला, त्याची गुणवत्ता तपासणी कोणी केली आणि वजनात तूट का येते, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या धान्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.