![]()
व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन एकाच वेळी तीन नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या गंभीर घटनेला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत प्रहार आणि शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभा
.
सोमवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पाहणी केली. यावेळी प्रहारचे वसु महाराज, शहराध्यक्ष बंटी रामटेके, जितू दुधाने तसेच शिवसेनेचे आशिष धर्माळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी या घटनेसाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनाच जबाबदार धरत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत, यापूर्वीही स्फोटाच्या घटना घडलेल्या असताना त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर का वापरण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार यांच्याविरुध्द तातडीने कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केली.आता आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोषींवर कारवाई होणारच तीन दिवसांत चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात नेमक्या कोणाच्या आणि कोणत्या त्रुटी झाल्या आहेत, याची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. – आशिष येरेकर, जिल्हाधिकारी.