Headlines

करमाळ्यात रंगला सूरताल महोत्सव, चौधरी, दत्ता, टाईड, पेंधे यांचा सन्मान:29 वर्षांच्या संगीत साधनेचा गौरव; कमला भवानी संस्थेच्या वतीने आयोजन‎




संगीत ही मनाला शांती, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कला असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिक्षणासोबत भारतीय कला-संस्कृतीच्या संवर्धनाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही सोनिया जयकुमार गोरे यांनी दिली. कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी आणि पं. वि. दिं. पलुसकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच पं. के. एन. बोळंगे गुरुजी आणि पं. वि. दिं. पलुसकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि महिला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद फंड, विलास घुमरे, कन्हैयालाल देवी, श्रेणिक खाटेर, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी चिवटे, डॉ. हेमा शिराळ, सुनीता देवी, भारत शिंदे, संतोष शियाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनीउपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेश्मा जाधव आणि अर्चना सोनी यांनी केले. यावेळी बोलताना सोनिया गोरे यांनी सुरताल संगीत विद्यालयाच्या २९ वर्षांच्या कार्याचा गौरव केला. विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गायन आणि वादनाचे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य करण्याचे काम विद्यालय करत आहे. संगीत, नृत्य आणि भारतीय कला-संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा यावेळी ‘सुरताल पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना संस्थेचा मानाचा ‘सुरताल संगीत रसिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना मानाची पैठणी साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील कलाकारांच्या सादरीकरणाने रंगली मैफल यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, नगराध्यक्षा मोहिनी सावंत आणि ग्लॅमोवेल वेलनेस, पुणे यांच्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त करून सुरताल संगीत विद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. महोत्सवात सुरताल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला. गायन, वादन आणि नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. संगीतासह विविध सादरीकरणातून भारतीय कला-संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले. कलाकारांचा ‘सुरताल’ पुरस्काराने गौरव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *