Headlines

आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती अश्विनी सोनवणे यांची भेट:सभापतींनी रुग्णांच्या समस्या जाणून घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना‎



ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य केंद्रातील अडीअडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने फुलंब्री पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी सोमवारी (१५ जून) आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या

.

या भेटीदरम्यान उपसभापतींनी विशेषतः महिलांचे आरोग्य आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर भर दिला. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच, आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेवर तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी सादिक कारी, समीर पठाण, अजम शेख, भरत गौरे, फईम शेख आणि कृष्णा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती, वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्वरी मगरकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राजपूत यांनी केंद्रातील कामकाजाची माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *