![]()
आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने १० मानाच्या पालख्यांसोबत अन्य पालख्याही पंढरपूरकडे निघाल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची कामे दिलेल्या सूचनांप्रमाणे होत आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दोन्ही पालखी मार्गांची तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरात पाहणी केली आहे. तसेच मुक्काम, विसावा व रिंगण या ठिकाणांना भेटी देऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यात माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. याच पद्धतीने नातेपुते, अकलूज, बोरगाव, सदाशिवनगर येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगण ठिकाणांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कामे करण्याचे निर्देश दिले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे १९ व २० जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन करत आहेत. त्या दृष्टीने सर्व कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी सर्व यंत्रणा प्रमुखांनी कामाचे चोख नियोजन करावे. वारीसाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले. . बोंडले येथील सूचना: विसाव्याच्या ठिकाणी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, तसेच स्वच्छता व्यवस्था ठेवावी. येथे इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरचे (EOC) काम त्वरित पूर्ण करून पालख्या बाहेर पडण्याच्या मार्गावर मुरूम टाकावा. महामार्गावर आवश्यकतेनुसार रम्बलर, गतिरोधक व क्रॅश बॅरियर्ससह इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात. . वेळापूर येथील कामे: जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. पालखीतळाचे मुरमीकरण व सपाटीकरण करावे. जर्मन हँगरचे काम लवकर पूर्ण करून त्याच्या बाजूला असलेला मोठा खड्डा तात्काळ बुजवावा. पाटबंधारे विभागाच्या जागेची स्वच्छता करून झाडांच्या फांद्या कापाव्यात. . पुरंदावडे येथील तयारी: येथे होणाऱ्या गोल रिंगणाच्या अनुषंगाने योग्य मुरमीकरण व सपाटीकरण करावे आणि गवत काढून तात्काळ स्वच्छता करावी. ^पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार आहेत. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्यावरील जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. भाविकांना स्वच्छ पाणी, शौचालये आणि पालखी मार्गाबरोबरच पालखी मुक्काम, विसावा व रिंगण या ठिकाणी योग्य ती स्वच्छता राखली जाईल या दृष्टीने परस्परांशी समन्वय ठेवावा. वारी दरम्यान एकही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. – एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे. तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी सजवण्यात यावी. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले असून स्वागत कमानींसह विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आषाढीच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी थेट पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना फोन करावा. १९ व २० जुलै रोजी सोलापूर हद्दीत पालख्यांचे आगमन जिल्हाधिकारी पंढरीत मुक्कामी; यंत्रणेला आदेश विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी
Source link
आषाढी यात्रा:पालखी मार्ग, विसावा, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे