![]()
मनमाड-नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून, या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून, तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभ
.
राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागांत पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त रोजच समोर येत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण भागात डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, वाहतूक व्यवस्था, शेतमाल ने-आण आणि दैनंदिन प्रवासासाठी डिझेल-पेट्रोलची गरज वाढलेली असताना पुरवठा मात्र मागणीनुसार होत नसल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. विशेषतः शेतकरी सकाळपासून पंपांवर रांगा लावत असून, काही ठिकाणी डिझेलअभावी मशागतीची कामे खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सरपंच पवार यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांना मागणीनुसार टँकरपुरवठा होत नाही. पुरवठा उशिरा येणे, मागणीपेक्षा कमी इंधन देणे आणि काही भागात पुरवठा प्राधान्यक्रमात फरक पडणे, यामुळे पंपचालकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘पंपचालकांकडे इंधन नसताना ग्राहकांचा रोष मात्र त्यांच्यावरच व्यक्त होतो. प्रत्यक्षात पुरवठा यंत्रणेतील अडचणी व तेल कंपन्यांचे धोरण तपासण्याची गरज आहे’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नागापूर, पानेवाडी, मनमाड परिसर हा इंधन साठवणूक व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. येथून आयओसी, बीपीसीएल, एचपी आदी इंधन कंपन्यांद्वारा राज्यातील १६ जिल्ह्यांना दररोज सरासरी ४५० ते ५०० टँकर्समधून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचा नियमित पुरवठा केला जातो. अशा ग्रामीण पंपांवर टंचाई जाणवत असेल, तर हा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. इंधन टंचाईला तेल कंपन्यांचे धोरण जबाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले.
मागणीनुसार पुरवठा करा तेल कंपन्या, जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभाग यांनी संयुक्त बैठक घेऊन ग्रामीण भागातील पंपांना मागणीनुसार नियमित पुरवठा करावा, यासाठी ठोस नियोजन करावी. तसेच अनावश्यक घबराट, साठेबाजी किंवा काळाबाजार टाळण्यासाठीही यंत्रणांनी लक्ष ठेवावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.