Headlines

इथेनॉल पेट्रोलमध्ये नव्हे, खड्ड्यांत टाका, कदाचित ते तरी भरतील!:मुंबई-गोवा महामार्गावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल




मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवर आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी महामार्गाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कामांवर आणि वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर सडकून टीका केली. ‘दहा वर्षे झाली, तरी चित्र तेच’ आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टद्वारे राज्यसरकारवर टीका केली आहे, ते म्हणाले, “कदाचित या रस्त्यातही इथेनॉल मिसळलं असतं, तर काम लवकर पूर्ण झालं असतं,” असा टोला लगावला. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजी आणि डिसेंबरपूर्वी महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात गेल्या दशकभरापासून कामे सुरूच असून खड्ड्यांची समस्या कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. “राजवटीचं इंजिन आणि कंत्राटदारांची यंत्रणा फुल्ल स्पीडमध्ये आहे, पण रस्ते मात्र आजही खड्डेमय आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. इथेनॉलवरून टोला इथेनॉल धोरणाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आणखी एक टिप्पणी केली. “इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यापेक्षा तो या खड्ड्यांत टाका… कदाचित ते तरी भरतील. नाहीतर कंत्राटदारांचे खिसेच भरत राहतील,” असे म्हणत त्यांनी महामार्गाच्या कामांतील कथित निष्काळजीपणा आणि खर्चावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या पोस्टनंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच कंत्राटदार पळाले – राज ठाकरे
दरम्यान, रविवारी राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यादरम्यान ते संताप व्यक्त करत म्हणाले, “राजकीय हस्तक्षेपामुळेच या महामार्गाचे काम रखडले आहे. मागे मी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ‘कंत्राटदार कंटाळून निघून गेले’. पण माझा सवाल हा आहे की, ते कंत्राटदार कुणामुळे कंटाळले? आज मी नव्याने बांधलेल्या रस्त्यावरून आलो, पण त्याचीही अवस्था अत्यंत वाईट आहे. हा नवीन रस्ताही लवकरच खराब होणार आहे.” हेही वाचा.. तुमची जमीन हेच तुमचं अस्तित्व, जमिनी विकू नका:थेट उद्योगांत पार्टनर व्हा; राज ठाकरेंचे कोकणवासीयांना आवाहन, मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी मुंबई-गोवा महामार्गाचे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी हडप केल्या जात असून, महाराष्ट्रात जमिनी विकण्याचाच धंदा सुरू आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर असून ते आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी ‘तिसरी मुंबई’, कंत्राटदारांची पळापळ आणि कोकणवासीयांचे भवितव्य यावर अत्यंत आक्रमक शब्दांत भाष्य केले. सविस्तर बातमी वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *