Headlines

Manoj Jarange Patil Warns Shinde-Fadnavis Over Maratha Reservation


मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या कथित भूमिकेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. “पदाचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्

.

बावनकुळेंची भाषा आणि नोंदी रद्द करण्याचा डाव

मराठा समाजाच्या जुन्या नोंदी रद्द करण्यासाठी दिलेल्या पत्राच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सध्या हे सरकार मराठा समाजाच्या नोंदी कशा रद्द करायच्या, यासाठी रोज नवीन डाव शोधत आहे. कुणबी नोंदी रद्द करताना काहीतरी वेगळीच कारणे दिली जात आहेत. कधी म्हणतात नोंदीवर ‘कुढ कुच’ (खाडाखोड) लिहिले आहे, तर कधी म्हणतात पेनाने लिहिले आहे. 50-100 वर्षांपूर्वी सातबारे प्रिंटेड नव्हते, ते तलाठी हातानेच आणि पेनानेच लिहायचे. मग आता अक्षर बदलले म्हणून नोंदी कशा रद्द होऊ शकतात? बावनकुळेंना इतके कळत नाही का?”

सुप्रीम कोर्टाचा हवाला देता आणि स्वतःच हस्तक्षेप करता

जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की, ‘जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे चालते आणि सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही.’ मग बावनकुळेंनी स्वतःच्या अधिकारात पत्र काढून त्यावर सांकेतिक भाषेत ‘अ’ लिहून ‘त्वरित कारवाई करा’ असे आदेश कसे दिले? ‘अ’ लिहिणे याचा अर्थ त्या प्रस्तावाला प्रथम प्राधान्य देणे. जर सरकार हस्तक्षेप करत नसेल, तर मग अशा पत्राचा अर्थ काय? हा उघड उघड हस्तक्षेप आहे.”

दरेकरांना त्यांची जागा दाखवून देऊ

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतेच ‘जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली आहे,’ असे वक्तव्य केले होते. यावर संतापलेले जरांगे म्हणाले, “दरेकरांनी गरिबाच्या लेकरांना हिणवायचे थांबवावे. मराठ्यांची ताकद काय आहे, हे त्यांना थोडे दिवस थांबू द्या, बरोबर समजेल. मराठ्यांच्या जिवावर निवडून आलेले हे नेते पक्षासाठी लाचार झाले आहेत, त्यामुळे त्यांना मराठा बाप वाटत नाहीये. पण फडणवीसांमुळे दरेकरांचा किती देव्हारा होणार आहे, हे लवकरच दिसेल.”

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, हीच शेवटची संधी!

“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बावनकुळेंची चूक मान्य करून ती त्वरित दुरुस्त करावी. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्याचे प्रमाणपत्र समाजाला मिळायलाच हवे. जर सरकारने चूक सुधारली नाही आणि मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याशी असाच खेळ सुरू ठेवला, तर हाती काहीही राहणार नाही. मराठे आता खवळले आहेत, ते तुम्हाला घरी बसवतील,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

नितेश राणेंच्या बदलेल्या भूमिकेवर सकारात्मक प्रतिक्रिया

भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर जरांगे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “अडीच वर्षे मराठ्यांच्या विरोधात असलेले राणे आता मराठ्यांच्या बाजूने बोलू लागले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. जे लोक समाजाच्या बाजूने बदलले आहेत, त्यांचे स्वागतच केले पाहिजे. किमान त्यांना आता समाजाची जाणीव तरी होऊ लागली आहे.” एकूणच कुणबी प्रमाणपत्रांच्या रद्द होण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आगामी काळात हे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा…

सोलापुरात लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगेंवर टीकास्त्र: म्हणाले- चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली तर थयथय नाचतायत, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोलापुरातून जोरदार पलटवार केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत हाके यांनी सरकारसह ओबीसी नेत्यांनाही लक्ष्य केले. “कुणबीची चार प्रमाणपत्रे रद्द झाली तर जरांगे थयथय नाचत आहेत. मग ओबीसींच्या आरक्षणाचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलापूर दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.