![]()
गावातील ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या वार्षिक उत्सवाला अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. व्यंकटरमण “गोविंदा… गोविंदा… जय बालाजी महाराज”च्या जयघोषात मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वज उभारण्यात आला. ११ दिवस चालणाऱ्या भव्य उत्सवाची सुरुवात झाली.
.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुराणकाळापासून चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक परंपरांचे आजही गावकरी अत्यंत श्रद्धेने पालन करतात. उत्सव काळात गावातील पुरुष वर्ग दाढी किंवा कटिंग करत नाही. तसेच या ११ दिवसांत गावातील कोणतीही व्यक्ती गावाची वेश ओलांडून बाहेरगावी मुक्कामी जात नाही. गावात कोणत्याही घरात पापड, लोणचे किंवा वाळवण घालण्याचे काम केले जात नाही. नवीन कपडे किंवा वस्तू खरेदी करणे टाळले जाते. परिधान करणेही टाळले जाते.
इतर धर्मीय नागरिकदेखील श्रद्धेने सहभागी होतात उत्सव काळात गावात कुठल्याही प्रकारचे लग्नकार्य किंवा शुभकार्य आयोजित करण्यात येत नाही. विशेष म्हणजे या सर्व परंपरांचे पालन गावातील इतर धर्मीय नागरिकदेखील तेवढ्याच श्रद्धा आणि निष्ठेने करतात. सामाजिक ऐक्य, परंपरा आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन या उत्सवातून घडत असल्याने गावातील वातावरण अधिकच भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले आहे. पुढील ११ दिवस गावात भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.