![]()
पैठण शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीकडून दिव्यांग ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर वितरण करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत प्रतिज्ञा दिव्यांग संघटनेने तहसीलदारांकडे निवेदन दिले. संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विष्णू सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमांनुसार दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र काही गॅस एजन्सीकडून दिव्यांग ग्राहकांकडे दुर्लक्ष होत असून घरपोच सिलिंडर वितरणासाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम घेतली जात आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दिव्यांग ग्राहकांना आवश्यक सुविधा देण्याऐवजी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गॅस एजन्सीची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच दिव्यांग ग्राहकांना शासन नियमांनुसार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
Source link
दिव्यांग ग्राहकांकडून जादा दर आकारणी:पैठण तहसील कार्यालयासमोर आंदोलन