Headlines

उकाड्यामुळे रुग्णांचा आकडा वाढला:दररोज 250 पेक्षा अधिक रुग्णांची धाव, 50 वर रुग्णांना दररोज सलाईन, रक्तदाबाचे रुग्णही वाढले‎




तिवसा तापमानात वाढीचा थेट परिणाम आता शरीरावर होऊ लागला आहे.उन्हाचा फटका बसलेले अनेक रुग्ण तिवसा तालुक्यातील गावखेड्यातून शहराच्या दिशेने उपचारासाठी धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी होत असून त्यापैकी ५० ते १०० रुग्णांना सलाईन लावावी लागत आहे. ज्यामुळे आता नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून स्वतः चे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. सर्वत्र उकाडा वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असून अनेकांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. ताप, अशक्तपणा, पातळ संडास, हिवताप आदी लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. गेल्या १५ दिवसापासून तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांची नोंद ओपीडीत होत असून त्यांच्यावर रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व पथकाद्वारे उपचार केले जात आहेत. त्यामध्ये दररोज ५० ते १०० रुग्णांना आवश्यकतेनुसार सलाईन दिले जात आहे. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकल्यासह उन्हाचा फटका बसलेले अनेक रुग्ण देखील उपचारासाठी धाव घेत आहेत. तिवसा ग्रामीण रुग्णालयात सकाळच्या ओपीडीत जवळपास ३० पेक्षा अधिक रुग्णांना सलाईन दिले जात आहे.तर दिवसभरात ही संख्या ५० वर जात आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात देखील शेकडो रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची ओपीडी ही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना पाहिजे असणारी औषधे वेळेत उपलब्ध होत नसल्याची ओरड आजही कायम आहे. जिल्हा रुग्णालयाकडूनच औषधींचा पुरवठा मागणीपेक्षा कमी येत असल्याने रुग्णांना औषध मिळेनासे झाले असून त्यांना बाहेरून औषध खरेदी करावे लागत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालात उपचार घेणारे रुग्ण. छातीत दुखणाऱ्या रुग्णांची देखील रुग्णालयात धाव अति उन्हाचा थेट परिणाम हा हृदयावर देखील होतो.त्यामुळे छातीत दुखणारे रुग्ण देखील तिवसा ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत आहेत. आज सोमवारी देखील छातीत दुखणाऱ्या काही रुग्णांना सलाईन देऊन उपचार करण्यात आले. भरपूर पाणी प्यावे ^प्रचंड उकाड्याने शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होते. नागरिकांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, काही त्रास जाणवल्यास रुग्णालयात उपचारार्थ यावे. – डॉ. योगेश तलमले, वैद्यकीय अधिकारी, तिवसा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *