Headlines

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का:शुभांगी पाटील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, म्हणाल्या- उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही, पण..




महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाला काही दिवसांपासून धक्कयांवर धक्के बसत आहेत. आधी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आता एक महिला नेता देखील शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांच्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या शिंदे गटाच्या गळाला लागल्या असून, त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह धुळ्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुंबईत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत, शुभांगी पाटील यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी त्यांनी अशा सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता शिंदे गटाचा झेंडा हाती घेताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, ‘उद्धव ठाकरे यांच्यावर आपली कोणतीही नाराजी नसून केवळ हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सततच्या आग्रहास्तव आपण हा निर्णय घेत आहोत,’ असे त्यांनी सांगितले आहे. विकासनिधी मिळत नसल्याचे कारण पुढे करत, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. खासदारांच्या या महत्त्वपूर्ण बंडखोरीनंतर, आता आगामी काळात ठाकरे गटाचे आणखी काही प्रमुख नेते आणि पदाधिकारी देखील शिंदे गटाची वाट धरण्याची दाट शक्यता असून, यामुळे ठाकरे सेनेला लागलेली गळती यापुढेही सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *