![]()
बार्शी युवा महोत्सवात सहभागी झालेल्या युवकांना विविध स्पर्धा व सादरीकरणांचे मंच, निवास आणि भोजन व्यवस्था शोधताना कोणाकडे विचारणा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिवाजी महाविद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. विविध ठिकाणी क्यूआर कोड उपलब्ध करून देत आवश्यक माहिती एका क्लिकवर मिळण्याची सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे युवकांना इच्छित स्थळी पोहोचणे अधिक सुलभ झाले असून, महोत्सवातील सहभागाचा अनुभव सुखद होत आहे. कर्मवीर सांस्कृतिक नगरीत प्रवेश करताच विविध ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी क्यूआर कोडसह विविध स्थळांची नावे असलेले डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. तसेच महोत्सव परिसरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही क्यूआर कोडची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धकांना मंच, निवास, भोजन तसेच अन्य आवश्यक सुविधांची माहिती सहज उपलब्ध होत आहे. महोत्सवातील संगीत आणि वाङमय मंच वातानुकूलित आहेत. माध्यम प्रतिनिधींसाठीही स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात आला असून, कोणत्या मंचावर कोणते सादरीकरण सुरू आहे, याची माहिती या ग्रुपवर दिली जात आहेत. युवा महोत्सव सुरळीतपणे पार पडावा आणि सहभागी युवकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २९ समित्या कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी कलावंतांची सोय झालेली आहे.
Source link
उन्मेष सृजनरंगांचा…:युवा महोत्सवात क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर मिळते सुविधांची माहिती