Headlines

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया




माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अहिल्यानगरमध्ये कालच उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरीराला नैसर्गिक शीतलता देणाऱ्या तीन योगिक क्रिया योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या आहेत. या क्रिया अत्यंत सोप्या असून सर्व वयोगटातील नागरिक त्या सहज करू शकतात. वाढत्या तापमानात शरीरातील अंतर्गत थंडावा टिकवून ठेवण्यासाठी या संजीवनी क्रिया नक्कीच फायदेशीर ठरतील, असे विशाल शहा यांनी सांगितले. नागरिकांनी या नैसर्गिक उपाययोजनांचा लाभ घेऊन उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. योगशिक्षक विशाल शहा हे मरणोत्तर नेत्रदान व देहदान याचे समुपदेशक, मार्गदर्शक, प्रचारक व समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. कधी आणि कसे करावे योगशिक्षक शहा यांनी सांगितले की, या क्रिया वज्रासन, सिद्धासन, पद्मासन किंवा सुखासनात बसून कराव्यात. पाठीचा कणा व मान सरळ ठेवावी. शक्यतो उपाशीपोटी किंवा जेवणानंतर अडीच ते तीन तासांनी कराव्यात. उन्हाळ्यात सकाळी व दुपारी प्रत्येकी ३० आवर्तने करावीत. . चंद्रभेदी प्राणायाम उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यावा. थोडा वेळ कुंभक करून श्वास उजव्या नाकपुडीने सावकाश सोडावा. डावी नाकपुडी चंद्रनाडीचे प्रतीक असून ती शरीराला थंडावा देते. . शीतली प्राणायाम जीभ बाहेर काढून तिची नळीसारखी घडी घालावी. या नळीतून जोरात श्वास आत घ्यावा. त्यानंतर तोंड बंद करून श्वास हळूहळू नाकावाटे बाहेर सोडावा. यामुळे जिभेला आणि संपूर्ण शरीराला त्वरित थंडावा जाणवतो. . शीतकरी प्राणायाम जिभेचा शेंडा उलटा टाळ्याला लावावा. वरचे आणि खालचे दात एकमेकांवर घट्ट मिटून ओठ उघडे ठेवावेत. दातांच्या फटीतून “सी-सी” असा आवाज करत श्वास आत ओढावा. त्यानंतर तोंड बंद करून श्वास नाकावाटे बाहेर सोडावा. विशाल शहा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *