Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजल्या:आषाढी वारी पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथील संस्थानला दिली भेट




राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी शिळा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. तसेच, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे यांच्यासह विश्वस्त आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पवार म्हणाल्या की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरवर्षीचे हे भक्तीमय वातावरण मनाला भावते. माऊलींना भक्तांची काळजी असल्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडेल. भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावे आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी निसर्गाने पावसाला विश्रांती दिली असावी, असेही पवार यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, काल संपूर्ण जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथे न येता पुणे शहरातच थांबावे आणि पालखी शहरात दाखल झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या भाविक भक्तांची पुण्यातच व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *