Headlines

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे




आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तुकडा पडेल या भूमिकेवर मी आलो आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. यापेक्षा किती जास्त वेळ सरकारला द्यायचा, गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवर का अन्याय केला जातो? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्या समाजाला काही मिळत नसेल तर कठोर पाऊल उचलावे लागतील. सरकारची भूमिका दुटप्पी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता जे होईल ते होईल मी माझ्या शरीरांचा विचार करणार नाही. माझ्या समाजासाठी सर्व काही करण्याची माझी तयारी आहे. समाज बांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये. सरकारला मराठा समाजाबद्दल माया असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. सरकार केवळ बोलते आहे, समाजासाठी काही होणार नाही. मंडप न टाकता आम्ही हे उपोषण करणार आहोत. मला केवळ चर्चा नको आहे. तर माझ्या बांधवांना आरक्षण मिळणार आहे का? सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. पोलिस कट रचून आमच्यावर हल्ले करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही, आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सरकार काही काम करत नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. सरकारकडून साधेसाधे काम केले जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पण ते केले नाही. ओबीसींनी न मागता त्यांच्यासाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा जीआर काढला नाही. आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या. सरकारने 50 वर्षांमध्ये आमचे वाटोळे का केले. आमच्या 5 पिढ्यांचे नुकसान कोण भरूण काढणार.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *