Headlines

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र




कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. खुराणा यांनी आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत संजीवनी युनिव्हर्सिटीला ‘डॉ. सुधा अॅण्ड डॉ. सतीश खरे इनोव्हेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग लॅब’ ही आधुनिक उपकरणांनी सज्ज प्रयोगशाळा भेट दिली. या लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनानंतर डॉ. खुराणा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भविष्यातील कॉर्पोरेट जगाचे वास्तव मांडले. ते म्हणाले, शाश्वत यशासाठी तांत्रिक कौशल्यांसोबतच ‘परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःला बदलण्याची तयारी’ असणे गरजेचे आहे. डिजिटल साधने, सातत्यपूर्ण शिक्षण आणि स्वतःच्या कामाचे प्रभावी सादरीकरण हेच भविष्यातील नोकरीची हमी देईल. डॉ. खुराणा यांनी भेट दिलेल्या या प्रयोगशाळेत रोबोटिक्स, इंडस्ट्री ४.०, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, आयओटी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या आधुनिक विषयांचे प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे थेट उद्योग जगताला हवे असलेले ‘फ्युचर रेडी’ अभियंते कोपरगावात तयार होतील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला. या सोहळ्याला संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर, डॉ. सतीश खरे, डॉ. सुधा खरे, सुरभी खुराणा, कॉर्पोरेट रिलेशन्सचे इम्रान शेख व रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *