Headlines

‘एमपीएससी’ने अपात्र उमेदवारांची प्राध्यापक म्हणून केली नियुक्ती:कला संचालनालय भरती प्रक्रिया वादात; संभाजीनगर मॅटची नोटीस




एमपीएससीच्या भरती प्रक्रियेतील एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. कला संचालनालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी चक्क ‘फिटनेस क्लब’चे अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराची निवड केली आहे. या गंभीर अनियमिततेची दखल मॅटने घेतली आहे. कला संचालनालयांतर्गत ७९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. नियमानुसार उमेदवारांकडे दोन वर्षांचा शैक्षणिक अनुभव असणे अनिवार्य होते. मात्र, सुरुवातीला अपात्र ठरलेल्या उमेदवारांना थेट अंतिम यादीत स्थान देण्यात आले. तासिका तत्त्वावरील अनुभव ग्राह्य धरला जात नसतानाही, अनेक अपात्र उमेदवारांची निवड झाली आहे. माहिती अधिकारात हा सर्व सावळागोंधळ समोर आल्याने न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. काय आहे नियमबाह्य प्रकार? महिला गटातून प्रथम आलेल्या उमेदवाराचे फिटनेस क्लबचे प्रमाणपत्र स्वीकारले. अंशकालीन कामाचा अनुभव नियत नसतानाही ग्राह्य धरला. मुदत संपल्यानंतरही कागदपत्रे स्वीकारली. छाननी प्रक्रियेत बाद उमेदवार अचानक अंतिम निवड यादीत समाविष्ट झाले. नियुक्त्या न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार गट-अ संवर्गातील या महत्त्वाच्या पदांसाठी आयोगाने कोणतीही चाळणी परीक्षा न घेता केवळ थेट मुलाखतीतून निवड केली. या प्रकरणाची नागपूर मॅटने गंभीर दखल घेतली. ८० ते ९० टक्के उमेदवारांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह असल्याने आयोगाकडून अहवाल मागवला. या भरतीतील सर्व नियुक्त्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील, असेही स्पष्ट केले. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर मॅटनेही प्रतिवादींना नोटीस बजावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *