![]()
कोकण वगळता राज्यात बुधवार , ५ ते ७ मे पासून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भात जास्त जोर राहील तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणात मात्र उष्णतेची लाट राहील.
.
विदर्भात तीन दिवस, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस राहील. दरम्यान, सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.२ सर्वाधिक तापमान तर छत्रपती संभाजीनगरात ३९.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
निवडक शहरांचे तापमान ब्रह्मपुरी४४.२ अकोला४३.२ जळगाव४२.६ बीड४१.० सोलापूर४०.८ धाराशिव४०.० अहिल्यानगर३९.९ संभाजीनगर३९.३ नाशिक३६.२ (अंश सेल्सियस)