![]()
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांच्या पक्षाकडून अशी मागणी होणे स्वाभाविक असल्याचे सांगत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी ओबीसी आरक्षण, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांसह विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. भुजबळांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कोण घेणार? सध्या नाशिकमध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्यात यावे, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांसाठी अशी मागणी करणे साहजिक आणि योग्य आहे. मात्र, राज्याच्या पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेच मिळून घेतील. तो अधिकार त्यांचाच आहे, असे बावनकुळे म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये आज ओबीसी समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत ते म्हणाले, गेल्या ६५ वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ओबीसींसाठी जे निर्णय कधीच होऊ शकले नाहीत, तेवढे मोठे आणि ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण केले आहेत. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने आतापर्यंत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही समाजाच्या आणखी काही रास्त मागण्या असतील, तर त्या सरकार नक्की पूर्ण करेल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. पंकजा मुंडेंच्या राजकीय निवृत्तीवर मोठे भाष्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत काही संकेत दिले. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, मला पूर्ण खात्री वाटते की, पंकजाताई सध्या तरी राजकीय निवृत्तीसारखा कोणताही मोठा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा.. पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले: मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
ओबीसी आरक्षणावर सरकारची ग्वाही:काँग्रेसला 65 वर्षांत जे जमलं नाही, ते आम्ही केलं, उर्वरित मागण्याही पूर्ण करू- चंद्रशेखर बावनकुळे