![]()
औंढा नागनाथ येथील एका घरावर पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता ५ दुपारी छापा टाकून सुमारे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ .पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलिसांनी सांगितली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसायावर छापे टाकण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हाभरात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांचे पथक स्थापन केले आहे. औंढा नागनाथ शहरामध्ये एका भागामध्ये घरात अवैधरित्या गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक शामराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, जमादार जयदीप पवार, राजकुमार कुटे, ज्ञानेश्वर सावळे, महिला पोलीस कर्मचारी गारुळे यांच्या पथकाने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका घरावर छापा टाकला. दरम्यान पोलीसांनी घरातील साहित्याची झडती घेतली असता यामध्ये घरात एका ठिकाणी गुटख्याची पोते लपवून ठेवण्यात आल्याची दिसून आले. पोलिसांनी गुटख्याची पोती ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास, विमल गुटख्यासह तंबाखू आढळून आला. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
औंढा नागनाथ येथे एका घरावर छापा:सुमारे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त, औंढा पोलिसांची कामगिरी