![]()
सोयगाव तालुक्यातील शेतशिवारात मागील काही दिवसांपासून रानडुकरांसह हरणे व अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. अंधार पडताच वन्यप्राणी शेतात घुसून मका, ज्वारी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राण्
.
सोयगाव तालुक्यात-कपाशी ३२,८७५, मका-६,४३५ तसेच इतर पिके-३८९७ असे एकूण पेरणी-४१३४५ क्षेत्र लागवड झाली असून पैकी मका पिकाची ६,४३५ इतक्या मोठ्या क्षेत्रावर लागवड केली आहे. पावसातील खंडामुळे आधीच पिकांची वाढ खुंटली असून हाताशी आलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातच रानडुक्कर व हरणांचे कळप शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. रावेरी, सोनसवाडी, सोयगाव, गलवाडा यासह तालुक्यातील विविध भागांत वन्यप्राण्यांचा वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. रावेरी व सोनसवाडी परिसरात बिबट्याचाही वावर असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
नुकसान भरपाईची मागणी
पावसाच्या खंडामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन विभाग व प्रशासनाने शेतशिवारात पाहणी करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्ज काढून पिकविलेला मका उद्ध्वस्त कंक्राळा येथील शेतकरी विठ्ठल तुकाराम बडकणे यांनी रावेरी शिवारातील गट क्रमांक ७६ मध्ये दोन एकर क्षेत्रावर मक्याची लागवड केली आहे. या पिकासाठी त्यांनी युनियन बँकेकडून १ लाख २० हजार रुपये कर्ज घेतले असून, खासगी बचत गटाकडूनही १ लाख रुपयांची उचल केली आहे. मात्र, ११ सप्टेंबर रोजी रानडुकरांनी त्यांच्या मका पिकाचे सुमारे ५० ते ६० टक्के नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाच्या खंडामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन विभाग व प्रशासनाने शेतशिवारात पाहणी करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला.
“कर्ज काढून मका पिकाची लागवड केली. पावसाने साथ दिली नाही आणि आता रानडुकरांनी पिकाचे मोठे नुकसान केले. घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी व्यथा शेतकरी विठ्ठल बडकणे यांनी व्यक्त केली.