Headlines

कन्नडच्या आरोग्य अधिकारी कार्यालय रस्त्याची दुरवस्था:प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी‎




कन्नड शहर आणि तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा संपूर्ण प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या कार्यालयाकडे ये-जा करण्यासाठी तातडीने पक्का रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. किसान सभेचे कार्यकर्ते उदय गवळी, मनोज बाविस्कर, विशाल भालेराव, यासिन खान व आकाश बोलधने यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका आरोग्य विभागाचे कार्यालय ग्रामीण रुग्णालयाच्या लगत आहे. या कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोळंके, आरोग्य सहाय्यक विष्णू केदार, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक बाळकृष्ण गायकवाड यांच्यासह एकूण १३ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या या कार्यालयाच्या चहूबाजूंनी जंगली झाडाझुडपांचा मोठा वेढा पडला असून, परिसरात स्वच्छतेचा कमालीचा अभाव आहे. रस्ता तयार न केल्यास आंदोलनाचा इशारा या कार्यालयात सातत्याने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध शासकीय योजनांच्या नियोजनासाठी महत्त्वाच्या बैठका होत असतात. अशा परिस्थितीत रस्त्याची नसलेली सुविधा आणि अस्वच्छता यामुळे सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येचा गांभीर्याने विचार करून तातडीने रस्ता तयार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *