![]()
कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील असल्याने ते त्यांचीच बाजू मांडणार, ते काही ब्रह्मवाक्य नाही, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना, कायदेशीर निर्णयापेक्षा एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जनाधाराच्या जोरावर ‘लोकांच्या कोर्टात’ आपले नेतृत्व आधीच सिद्ध केले आहे, असा ठाम विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाचे वकील आहेत आणि ते त्यांचीच बाजू मांडणार. कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही. ते त्यांच्या आशिलाचीच बाजू मांडणार. शेवटी कपिल सिब्बल आहेत, त्यांना ठाकरे गटाने अपॉईंट केले आहे, त्यामुळे ते आमची बाजू मांडणार नाहीत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षचिन्हाचा फायदा शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत झाला असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के म्हणाले, त्यांनी काय मुद्दा मांडावा किंवा त्यांनी काय मांडलेले आहे त्यावर आमचे ऑब्जेक्शन नसावे. लोकांच्या कोर्टात, लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवले आहे. जनाधार त्यांच्यासोबत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य प्रचंड प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या कोर्टात त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. आज झालेल्या सुनावणीवर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, कोर्टाच्या निर्णयावर कोर्ट निर्णय देईल. लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. लोकांच्या कोर्टात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेवर आमचा विश्वास आहे, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.
Source link
'कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही!':नरेश म्हस्केंचा शिवसेना ठाकरे गटावर टोला, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर केले भाष्य