Headlines

अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकाच्या पथकाचा छापा:24 कागदपत्रे तपासणीसाठी घेतली ताब्यात




हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथे अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकांच्या पथकाने गुरुवारी ता. 6 एका घरावर छापा टाकून 24 कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये काही रजिष्ट्री, इसार पावत्यांचा समावेश आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा येथील धम्मपाल कांबळे हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यावरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक बालाजी पठाडे, सहकार अधिकारी विजय गिते, अनोज वानखेडे, के. जी. घालेवाड, नामदेव शितोळे, श्रीरंग चव्हाण, पोलिस कर्मचारी विशाल इंगोले यांच्या पथकाने आज सकाळी साडेनऊ वाजता लिंबाळा येथे जाऊन कांबळे यांच्या घराची तपासणी केली. यावेळी तपासणीमध्ये विविध 24 कागदपत्रे सापडली आहेत. यामध्ये इसार पावत्या, खरेदीखताचा करारनामा, मक्तेपत्र, एक कोरे मुद्रांक शुल्क, गाव नमुना क्रमांक आठ यासह इतर कागदपत्रांचा समावेश आहे. सुमारे अडीच तास झालेल्या तपासणीनंतर या पथकाने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर आता या कागदपत्रांवरील लिहून देणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्षात बोलावून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांचे जवाब नोंदविल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. आता या चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार याकडे लिंबाळा येथील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकरीच्या संशयावरून एका महिन्यात ही दुसरी कारवाई आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *