Headlines

पुणे महिलांसाठी आरोग्य तपासणी अभियान; हेल्थकार्ड मिळणार:महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा, टप्प्याटप्प्याने शिबिरे




पुण्यात गरजू आणि कष्टकरी महिलांसाठी आरोग्य तपासणी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महिलांना हेल्थकार्ड दिले जाणार असून, त्यात त्यांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभियानाचे उद्घाटन ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान वर्षभर चालणार असून, टप्प्याटप्प्याने शहरभरात शिबिरे घेतली जातील. प्रत्येक महिलेची दर तीन महिन्यांनी पुन्हा तपासणी करण्यात येईल. या शिबिरांमध्ये हिमोग्लोबिन, थायरॉईड, कॅल्शियम आणि रक्तदाब तपासणी केली जाईल. आवश्यक औषधे आणि पुढील उपचारांसाठी गरजू महिलांना मार्गदर्शनही केले जाईल. शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस यांच्या माध्यमातून हे शिबिर राबवले जाणार आहे. महिलांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य देखरेख कायम ठेवणे, तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारांचा अभ्यास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. खासगी लॅब आणि डॉक्टरांचे सहकार्य देखील घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ हजार महिलांची तपासणी अपेक्षित असून, त्यासाठी नोंदणी केली जाईल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता घराजवळील रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन महापौर नागपुरे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *