Headlines

कर्जमाफी यादी:कर्जमाफीच्या 1378 गावनिहाय याद्या आज होणार प्रसिद्ध




लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे आणि त्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची परतफेड वेळेत न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे योजनेसाठी विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजनेत अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन यापूर्वीच जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *