Headlines

ओंकारनगर'चा दिंडी सोहळा:लेझीमचा ठेका अन् पर्यावरणाचा मेळा, केडगाव परिसरात रिंगण सोहळा, फुगडीचा उत्सा




मनपाच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून केडगाव परिसरात ‘बालदिंडी’ काढली. भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या या बालदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात निघालेल्या या बालदिंडीचे ठिकठिकाणी नागरिक आणि भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विठ्ठलाच्या भक्तीगीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. शाहूनगर बसस्थानक येथे बालदिंडी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध ‘उभे रिंगण’ धरले आणि विविध अभंगांचे अप्रतिम सादरीकरण केले. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी तल्लीन होऊन फुगडीचा आनंद लुटला. लेझीम पथकाच्या विविध नृत्यांमुळे संपूर्ण केडगाव परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. बालदिंडीत सहभागी झालेल्या बालवारकऱ्यांना श्रीराम टी सेंटर (शाहूनगर) तसेच कांताबाई तोडमल यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा पल्लवी भुजबळ, उपाध्यक्षा दुर्गा घेवारे, सदस्य दीपाली साळवे, पूनम बडे, कविता वर्तले, कमल पाखरे, पूजा नेटके, कांताबाई तोडमल, सागर घेवारे आणि अंगणवाडी सेविका रोहिणी दळवी, शुभांगी बेरड, भारती आहुजा आदी सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्मिणी दर्शन अन् सामाजिक प्रबोधन बालदिंडीने माधवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. माधवनगर परिसरातील नागरिकांनी बालदिंडीचे उत्साहात स्वागत केले. या दिंडीत “वृक्ष जगवा, जीवन फुलवा” “झाडांचे रक्षण, आपले संरक्षण” “हम सब का एक ही नारा, साफ-सुथरा देश हमारा” “भारताने दिला मान, स्त्री-पुरुष एकसमान” “मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण” “दुर्गंधीचा घाला आळा, पर्यावरणाचा ह्रास टाळा” “स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे” अशा घोषणा असलेले विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे विविध फलक धरून उपस्थितांचे लक्ष वेधले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *